खडकी (बा.) येथील तीन अवैध दारू विक्रेत्यांची देशी, विदेशी दारू,जप्त…!
हिमायतनगर पोलिसांची धडक कारवाई : पाच जणांनवर गुन्हा दाखल.

प्रतिनिधी विकास गाडेकर करंजीकर/हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथील वेगवेगळ्या तीन ठिकाणी भोकर, हिमायतनगर पोलिसांनी धाड घालून तीन अवैध दारू विक्रेत्यांकडून दारू जप्त केली आहे. ही कारवाई 22 जानेवारी 2025 रोजी करण्यात आली. यामध्ये 1) शेख जिलानी शेख बाबा, 50 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि. नांदेड 2) वसंत अमरसिंग राठोड, 46 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि.नांदेड.3) रोहित वसंत राठोड, 21 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि. नांदेड.4) अक्षय लक्ष्मण राठोड,23 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि.नांदेड.5) तानाजी सदाशिव सोळंकी, 41 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि.नांदेड यामध्ये पहिल्या कारवाईत आरोपी नामे 1) वसंत अमरसिंग राठोड, 46 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, 2) रोहित वसंत राठोड, 21 वर्ष, 3) अक्षय लक्ष्मण राठोड, 23 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि. नांदेड यांचे वज्रधारी धाबा, हिमायतनगर येथून विदेशी दारूच्या 87 बॉटल्स, कि.अं. 13,920/- रु. व रोख रक्कम 12,150/-रु. अशी एकूण 26,070/- रु. किंमतीची मालमत्ता मिळून आल्याने गु.र.क्र.13/25, कलम 65 (ई) म.दा.अ.1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दुसऱ्या कारवाईत,2) आरोपी नामे शेख जिलानी शेख बाबा, 50 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि. नांदेड याचे रहाते घरी देशी दारूच्या 28 बॉटल्स, कि.अं.1,960/- रु., विदेशी दारूच्या 12 बॉटल्स कि.अं. 1,920/- रु. तसेच 02 तलवार व 01 खंजर मिळून आल्याने गु.र.क्र. 14/25, कलम 65 (ई) म.दा.अ.1949 सह 4,25 भाहका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तिसऱ्या कारवाईत.3) आरोपी नामे तानाजी सदाशिव सोळंकी, 41 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि.नांदेड याचे टिन पत्र्याचे शेडमध्ये देशी दारूच्या 93 बॉटल्स, कि.अं. 6,510/- रु., मिळून आल्याने गु.र.क्र. 15/25, कलम कलम 65 (ई) म.दा.अ.1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.नमुद गुन्ह्यात एकूण 36,460/-, रु.ची मालमत्ता, 02 तलवार व 01 खंजर हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केली असून मा. वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे ही कारवाई पोलिस मा.श्री.अबिनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि. नांदेड यांना ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत हिमायतनगर मध्ये अवैध धंद्यांची गोपनिय माहिती मिळाल्याने मा.पोलीस अधिक्षक साहेब यांनी सदर अवैध धंद्यांवर वर कारवाई करणेबाबत श्रीमती. शफाकत अमना, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर यांना एक विशेष पथक तयार करून कारवाई करणेकामी आदेशीत केले होते.त्या अनुषंगाने दिं.22/01/2025 रोजी श्रीमती. शफाकत अमना, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर व पथक तसेच पोनि/अमोल भगत, हिमायतनगर व पथक असे पथक तयार करून छापा मारून खालीलप्रमाणे संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.आरोपी विरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.अशी माहिती हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पो.नि. अ.भगत यांनी आपल्या प्रेस नोट मद्ये दिली आहे.या दमदार कारवाई बद्दल पोलीस स्टेशन हिमायतनगर यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.