देशक्राइम

मातंग समाजाच्या महिला कामगारांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडून अनेक महिला मृत्युमुखी..

विकास गाडेकर/नांदेड जिल्ह्यातील मौजे आलेगाव येथे आज सकाळी 11 महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात अनेक महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे या सर्व महिला मागासवर्गीय मातंग समाजाच्या अत्यंत गरीब कुटुंबातील मजूर महिला होत्या त्यांचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव तालुका वसमत असून त्या शेती कामासाठी जात असताना हि दुर्दैवी घटना घडलेली आहे.

यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडवणीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे जाहीर केलेले असले तरी अपघातातील ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे हा अल्पवयीन असल्याचे समजत आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांच्या शेतात सदर महिला काम करण्यासाठी जात होत्या त्या शेतमालकाचाच हा अल्पवयीन मुलगा ट्रॅक्टर चालवत कामगार महिलांना घेऊन जात होता. त्यानुसार वाहन कायदा अधिनियम प्रमाणे सदर ड्रायव्हर हा अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या पालकावर मृत्यूस कारणीभूत व इतर कलमानुसार रितसर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच मृत्युमुखी व जखमी असलेल्या महिलांमध्ये काही अल्पवयीन मुली सुद्धा कामगार असल्याची माहिती मिळालेली आहे त्यानुसार संबंधित शेतमालकावर बालकामगार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच इतर अशा प्रकरणांमध्ये दहा लाख रुपयांची मदत मृतांच्या नातेवाईकांना दिली जाते त्याचप्रमाणे या प्रकरणात सुद्धा पाच लाख रुपयांच्या अर्थसहाय्य ऐवजी दहा लाख रुपयाची प्रत्येकी मदत मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर करून तसे पत्र मा.जिल्हाधिकारी व तेथील प्रशासनाने तात्काळ मृतांच्या नातेवाईकांना द्यावे अन्यथा लहुजी शक्ती सेना नांदेड व हिंगोली जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नांदेड जिल्हा प्रशासन तसेच हिंगोली जिल्हा प्रशासन यांनी नोंद घ्यावी असे बालाजीभाऊ गायकवाड यांनी यावेळी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}