क्राइम

नांदेड शहरात भरदिवसा गोळीबारात  एक ठार,तर एक जण गंभीर जख्मी…

नांदेड नव्हे बिहार राज सुरु.!

प्रतिनिधी (धोंडोपंत बनसोडे)नांदेड शहर व परिसरात गुन्हेगारांनी पुन्हा डोकेवर काढले यातुन,तीन जणांमध्ये टोकाचा वाद होऊन एकाने दुसऱ्या एकावर भर दिवसा शहरातील गजबजलेल्या ठिकाणा वरुन प्रचंड गोळीबार केलाआहे.यात एक जण जागीच ठार झाला आहे.तर अन्य एक गंभीर जख्मी झाले असल्याचे दुर्दैवी घटना घडल्याने संपुर्ण नांदेड जिल्हा सह शहरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन,काही ठिकाणी अफवांचे पीक जोमात सुरु झाले असल्याने,शहरातील नागरिक आता नांदेड नव्हे तर बिहार राज सुरु झाले आहे. असे म्हणत आहेत.यामुळे आता जिल्ह्यासह शहरातील जनता सुरक्षित न राहता दररोज आपला जीव मुठीत धरुन जिल्ह्यासह शहरात सामान्य नागरिक आपला व्यवहार करत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.या घटना भरदुपारी घडली आहे. शहरात विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप तर जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस निरीक्षक यंत्रणा व कार्यालय चालू असताना त्यांच्या नाकावर टिच्चून भरदुपारी प्रचंड प्रमाणात गोळीबार होत आहेत. या घटनेमुळे आयजी आणि एसपी यांचा आता धाक राहिलेला नसल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत आहेत. याकडे दोन्ही जबाबदार आयपीएस पोलीस अधिकारी यांचे काम सैल झाले आहे. जिल्हात व शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यात वाढ झाली आहे.तर सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अवैध धंदे करत असल्याने कारवाई होत नसल्याची ओरड नागरिकातुन नेहमी होत आहे. मौजे वसरणी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ दिं.११मे २५ रविवारी सकाळी ११:०० वाजता ही घटना घडली आहे. तयामुळे ‘ब्रेक के बाद’ नांदेडमध्ये गोळीबाराचा अनुभव नांदेडकरांना आला आहे.

दोन महिन्यापुर्वीच शहरातील गुरुद्वारा गेट क्रमांक परिसरात घडलेल्या गोळीबाराची चर्चा थंडावत असताना, आज दि.११मे रोजी सकाळी पुन्हा एकदा गोळीबाराने नांदेड शहर हादरले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आशु पाटील उर्फ कमलेश लिंबापुरे याच्यांसह शेख परवेज, तेजासींग बावरी या तिघांमध्ये किरकोळ कारणा वरुन वाद सुरु होता. प्रारंभी किरकोळ असलेला हा वाद भयंकर टोकाला जाऊन यातुन कमलेश लिंबापुरे उर्फ आशु पाटील याने शेख परवेज व तेजासिंग बावरी यांच्या वर भरदुपारी प्रचंड प्रमाणात गोळी झाडली आहे.यात शेख परवेज वय २५ वर्ष हा तरुण जागीच ठार झाला आहे.तर त्याच्यासोबत असलेला तेजासिंग बावरी हा गंभीर जख्मी झालाआहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी घटनास्थळाला भेट दिली असुन, या गोळीबारात जख्मी झालेल्या तेजासिंग बावरी याला जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलेआहे.ही गोळीबाराची घटना नेमके कोणत्या कारणाने घडली आहे. या मागे कोणकोण सराईत गुंडांची टोळी सक्रिय आहे काय? दिवसाढवळ्या एकमेकांवर पिस्तुलाने भरचौकात गोळीबार झाला असल्याने या घटनेचा अधिक तपास जलदगतीने होऊन सत्य सामान्य नागरिकांसमोर येणे गरजेचे आहे. नांदेड पोलीसांचा धाक दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. पुन्हा एकदा नविन पोलीस अधीक्षक अधिकार्‍यांचे गरज भासत असल्याचे नागरिकांतुन बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}