राजनीति

किनवट येथे रविवारी राष्ट्रवादी युवक कांग्रेसची आढावा बैठक..!

प्रतिनिधी किनवट/राष्ट्रवादी युवक कांग्रेसची आढावा बैठक मा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आदेशानुसार १ जून रविवार रोजी शासकीय विश्राम गृह किनवट येथे आयोजीत करण्यात आली आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष इंजी स्वप्निल इंगळे पाटील यांची उपस्थिती असणार आहे. सोबत युवकचे प्रदेश सरचिटणीस अतुल हिंगमिरे, प्रदेश सचिव तेजेंदिरसिंह ढाकणीवाले, प्रदेश सचिव विक्रम नागशेटीवार, जिल्हा सरचिटणीस प्रवीण भाऊ घुले, वैदकीय आघाडीचे अमोल मालेगावकर,युवक जिल्हा उपाध्यक्ष श्रीनाथ गिरी, पांडुरंग पावडे,सय्यद जफर, श्रीनिवास हिवराळे,या बैठकीला राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय सिडाम, विधानसभा अध्यक्ष वैजनाथ करपुडे पाटील, माजी नगराध्यक्ष इसा खान,शहर अध्यक्ष हबीब चव्हाण, युवक नेते सुगत नगराले, विशाल भवरे,कामेश मुनेश्वर, गौतम भवरे हे उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी कांग्रेस च्या तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष पदासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत तसेच येणाऱ्या काळात राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे संघटन मा आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतुत्वात कसे वाढेल या बदल व राष्ट्रवादी कांग्रेस च्या सद्यस नोंदणी बदल या बैठकीत चर्चा होणार आहे.
या बैठकीला जास्तीत जास्त संख्येने युवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे विधानसभा अध्यक्ष चेतन मुंढे यांनी केल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}