मा.आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे- स्वप्निल इंगळे पाटील.

प्रतिनिधी:मुदखेड तालुका राष्ट्रवादी युवक कांग्रेसची आढावा बैठक राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे नूतन जिल्हा अध्यक्ष स्वप्निल इंगळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीमध्ये पुढील काळात राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे संघटन कसे वाढवीणार व पक्ष सद्यस नोंदणी अभियाना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रवादी पक्षाची ओळख ही सर्व समाज घटकाला सोबत घेऊन जाणारा पक्ष अशी आहे यामुळे युवकांचा सगळ्यात जास्त ओढा हा राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. त्यामुळे अनेक युवक हे ना . अजितदादा पवार व युवक कांग्रेस चे प्रदेश अध्यक्ष सुरज दादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी युवक कांग्रेस मधे काम करण्यास इच्छुक आहेत.
भोकर मतदार संघात काम करत असताना राष्ट्रवादी पक्षाची आठवण येथील नेत्यांना मागे राष्ट्रवादी पक्ष आघाडी मधे असो की युती मधे असो फक्त त्यांची निवडणूक असेन तेव्हाच येते पण जेव्हा सत्तेत वाटा द्यायचा असो तेव्हा त्यांना राष्ट्रवादी पक्षाचा विसर पडतो.
युवक पदधिकारी यांनी मुदखेड मधे जोमाने गावा गावा मधे जाऊन युवकांची मोठ्या प्रमाणात बांधणी करावी. काम करत असताना काही अडचण आली तर मी तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे तुमचा काही काम असो ते सोडवण्याची खात्री मी देतो कारण माझ्या मागे मा आमदार प्रताप पाटील यांची ताकत खंबीरपणे आहे. आपण पक्षाच काम करुन पक्ष संघटन वाढवून पक्षाला कशी बळकटी देता येईल याचा प्रयत्न करावा.
यावेळी तालुका अध्यक्ष आनंद टिप्परसे, शेख मुकीद , राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव तेजेंदीर ढाकणीवाले , युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत नटूरे, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीनाथ गिरी, जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास हिवराळे, जिल्हा उपाध्यक्ष सजीत शेख, संतोष गायकवाड, दास हनमंते, बाळू हनमंते, माधव हनमंते,शंकर रहाटीकर, शेख मेनु भाई,माधवराव शिंदे, लक्ष्मण शिंदे, राजू शिंदे, गोविंदराव शिंदे, संतोष पाटील, केशव शिंदे, बालाजी शिंदे , साईनाथ शिंदे या बैठकीचे नियोजन हे विलास पाटील कल्याणे मुगटकर यांनी केले होते.