अखेर ढाणकीत शिवसेना शिंदे गट स्थापन..
पत्रकार संजय सल्लेवाड यांचे नेतृत्वात शेकडो युवकांचा प्रवेश.

ढाणकी प्रतिनिधी:आसिफ खान पठानमहाराष्ट्रात सर्वत्र शिवसेना शिंदे गटाची पकड मजबूत होत असताना ढाणकी मात्र आजपावेतो यास अपवाद राहिले होते. परंतु ढाणकी येथील निर्भिड युवा तरुण, दर्पण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा यशस्वी युवा उद्योजक संजय सलेवाड यांचे नेतृत्वात आज दि. १२ जून २०२५ रोजी शहरातील शेकडो युवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, शिवसेना शिंदे गट सर्वत्र आपले पाय मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सदर प्रवेशाहून जाणवते. ढाणकी येथील शिवसेना शिंदे गटात प्रवेश झालेल्या युवकांमध्ये सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षातील शेकडो युवक सहभागी होते. स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे यांच्या विचारधारेवर तथा शिवसेनेचे नेते, माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केल्याचे युवकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड,तालुक्यातील नेते चितांगराव कदम सर,कृ. उ. बा.समिती संचालक प्रवीण पाटील मिराशे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, उमरखेड शहराध्यक्ष ॲड. संजीव जाधव,महिलाध्यक्षा आशाताई कलाने,रविकांत रुडे, कैलास कदम कंत्राटदार,गोलू महाराज,शहाणे यांसह शिवसेनेचे जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजू गायकवाड यांनी केले.
माझा समाज हा अत्यंत मागासलेला भटक्या विमुक्त जमातीतला असून, समाजाचा विकास साधने, मोठ्या प्रमाणात माझा समाज टेंभेश्वरनगर येथे राहतो. त्यांच्या राहत्या जागेवरील शासन हा शब्द हटवून ती जागा त्यांच्या स्वतःच्या नावे व्हावी हा एक प्रामाणिक उद्देश. तसेच पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून ढाणकी शहरात आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन. यापुढे आता भरपूर कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतील व ढाणकी शहरात शिवसेना शिंदे गट दिमाखामध्ये उभा राहील याची मला खात्री आहे.संजय सलेवाड शिवसेना शिंदे गट ढाणकी