राज्यातील कायाकल्प अवार्ड मध्ये नांदेड जिल्हा राज्यात प्रथम..

नांदेड राज्यात कायाकल्प योजना मध्ये सर्व शासकीय दवाखान्यातील आरोग्य विषयक पायाभूत सुविधा व सेवा, रुग्णालयातील स्वच्छता व इतर उपक्रम साठी मूल्यांमापन करण्यात येते गुणानुक्रमे कायाकल्प अवार्ड देण्यात येते..
सन 2024-2025 नांदेड जिल्ह्यातील एकुण 70 प्राथमिक आरोग्य केंद्र पैकी 41 प्राथमिक आरोग्य केंद्राना कायाकल्प अवार्ड 2024-2025 या वर्ष चा मिळाला आहे. जिल्हा मध्ये प्रथम पुरस्कार तालुका देगलूर मधील प्राथमिक आरोग्य केंद्र मरखेल,यांना 2 लाख रुपये बक्षीस व इतर 40 प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रोत्साहन बक्षीस 50 हजार रुपये मिळण्यासाठी पात्र ठरले आहे. नांदेड जिल्हा 50% पेक्षा जास्त प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी पात्र ठरले आहे त्यामुळे राज्यात कायाकल्प मध्ये अव्वल ठरला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सगिता देशमुख हे 16 जुलै 2024 रोजी रुजु झाले तेव्हा पासून त्याचा कामाचे कार्यशैली मुळे जिल्हा मध्ये गावपातळीवर जाऊन आरोग्य विषयक उपक्रम व कामे प्रभावी आरोग्य यंत्राणा राबवून त्यांनी राज्यात कायाकल्प मध्ये अव्वल स्थान जिल्हाला मिळवून दिले आहे याची या बाबतीत प्रतिक्रिया घेतली असता या कामाचे श्रेय मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यश मिळाले त्या बद्दल जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी व त्यांची टिम सर्वाचे अभिनंदन या वर्षी सन 2025-2026 मध्ये जास्तीत जास्त प्राथमिक आरोग्य केंद्र ला कायाकल्प अवार्ड जिल्हाला मिळतील हिच अपेक्षा तसेच या वर्षी NQAS साठी जिल्हा मधील 25 प्राथमिक आरोग्य केंद्र चा प्रस्ताव पाठविणार आहे तरी सर्व जिल्हा मधील तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी हे सामाजिक बांधिलकी ठेवून मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम याचा मार्गदर्शन खाली काम करुन जास्तीत जास्त प्राथमिक आरोग्य केंद्र पात्र ठरवुन गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा ग्रामीण भागातील नागरिक उपलब्ध होतील असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सगिता देशमुख यांनी केले आहे.
पोटा,कामारी, जवळगांव उपकेंद्र आणि प्रा आरोग्य केंद्र सरसमला प्रोत्साहन 24_25 वर्षी चे कायाकल्प पुरस्कार भेटला आहे त्या बद्दल डी,एच,ओ मॅडम यांनी सरसम येथे येऊन कर्मचारी वर्ग यांचा सत्कार केला आहे