टेंभेश्वरनगर येथील शासकीय जमिनीवरील शासन हटविण्याकरिता शिवसेना (शिंदे गट) आग्रही.
संजय सलेवाड यांची अपील.

ढाणकी / प्रतिनिधी : आसिफ खान पठान येथील शेत सर्वे नंबर १६७ मधील टेंभेश्वरनगर येथील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनाकरिता केलेले अतिक्रमण, नियमानुकूल करण्याकरिता, शिवसेना शिंदे गटाचे ढाणकीतील नेते संजय सलेवाड यांनी पाठपुरावा सुरू केला असून, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे सदर प्रकरणी गांभीर्याने लक्ष देत असल्याचे, संजय सलेवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आणि यात लवकरच यश मिळणार असून टेंभेश्वरनगर येथील गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनीवरील शासन हटवून, त्या जमिनी त्यांच्या स्वमालकीच्या होऊन, सर्व शासकीय योजनांचा लाभ टेंभेश्वरनगर येथील नागरिकांना लवकरच मिळेल असे सलेवाड यांनी सांगितले.
याप्रकरणी ढाणकी नगरपंचायत प्रशासनाने नगर विकास विभागास पत्र व्यवहार सुद्धा केला होता. सदर प्रकरणी काही त्रुटी असल्याचे पत्र नगर विकास रचने कडून ढाणकी नगरपंचायत ला दि. ७ एप्रिल २०२५ ला मिळाले. परंतु अद्याप पर्यंत सदर त्रुटी ढाणकी नगरपंचायत कडून पूर्ण करण्यात आल्या नसल्याकारणाने, संजय सलेवाड यांच्या शिफारशीने संजय राठोड यांचे यवतमाळ येथील कार्यालयातून, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधर मोहोड (काका) व जिल्हाप्रमुख यशवंत पवार यांनी ढाणकी नगरपंचायत चे प्रभारी मुख्याधिकारी यांना तात्काळ या त्रुटी पूर्ण करून देण्यात याव्या असे आदेश दिले. लवकरच राज्याचे मंत्री संजय राठोड हे सदर प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक घेणार आहेत अशी सुद्धा माहिती सलेवाड यांनी दिली.
टेंभेश्वरनगर येथे राहणारे नागरिक अत्यंत गोरगरीब प्रतिकूल परिस्थितीचे असून, त्यांच्या जागेवर शासन असल्याकारणाने त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ आज पर्यंत मिळाला नाही. परंतु माननीय संजय भाऊ राठोड या दुर्लक्षित घटकाकडे गांभीर्याने लक्ष देऊन, टेंभेश्वरनगर येथील नागरिकांना शंभर टक्के न्याय मिळवून देतील अशी खात्री आहे. त्यासाठी मी सदर शासन शब्द हटेपर्यंत नियमित पाठपुरावा करणार आहे.संजय सल्लेवाड शिवसेना (शिंदे गट) ढाणकी शहर