राजनीति

ढाणकी मध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला खिंडार शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश..

ढाणकी प्रतिनिधी: ढाणकी येथील संजय गंगाराम सल्लेवाड यांनी पंधरा दिवस अगोदर शिव सेना शिंदे गटात प्रवेश केला होता. पक्ष प्रवेश करताच संजय सल्लेवाड यांनी टेंभेश्वरनगर येथे राहणारे नागरिक अत्यंत गोरगरीब परिस्थितीत असून, त्यांच्या जागेवर शासन असल्याकारणाने त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ आज पर्यंत मिळाला नाही. म्हणून यांची समस्या मार्गी लावण्यासाठी यवतमाळ जिल्हा पालक मंत्री संजय भाऊ राठोड यांना दुर्लक्षित घटकाकडे गांभीर्याने लक्ष टाकण्याची विनंती करत टेंभेश्वरनगर येथील नागरिकांना शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करत आहे.त्यांची गोरगरीबासाठी तळमळ बगता आज ढाणकीतील जवळपास दोनशे महिला आणि शेकडो पुरुष आणि युवकांनी आज 28 जून रोजी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या जन्मदिवस सप्ताह निमित्त भव्य पक्ष प्रवेश सोहळा,सदस्य नोंदणी अभियान व ढाणकी येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन च्या शुभ प्रसंगी उदघाटक शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख मोहोड काका, कार्यक्रमाचे शिवसेना अध्यक्ष जिल्हा प्रमुख यशवंत पवार यांच्या उपस्थितीत शिवसेना ढाणकी शहर प्रमुख संजय गंगाराम सल्लेवाड यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला यात महत्वाचे भारतीय जनता पार्टीचे ढाणकी सोशिअल मीडिया प्रमुख सुनील मांजरे, भाजप कार्यकर्ता विशाल कोठारी व काँग्रेस पार्टीचे ढाणकी शहर उपअध्यक्ष सुनील कदम व काँग्रेस ढाणकी शहर सचिव सुधाकर बाभुळकर यांनी प्रवेश घेतल्याने ढाणकी मध्ये भाजप आणि काँग्रेसला खिंडार पडल्याचे बोलल्या जात आहे.यावेळी कार्यक्रम कैलासभाऊ कदम (मा. उपजिल्हाप्रमुख शिवसेना, उमरखेड),अलिनअण्णा नरवाडे (जेष्ठ शिवसैनिक, उमरखेड), सौ. आशाताई विक्रम पाटील कलाने (शिवसेना महिला तालुका प्रमुख), श्री. संजय गंगाराम सलेवाड (शिवसेना शहरप्रमुख, ढाणकी), श्री. नागनाथ अनंतराव दिल्लेवार (शहर संघटक, ढाणकी) उपस्थितीत पार पडला

 

शिवसेनेला ढाणकी येथे संजय गंगाराम सल्लेवाड सारखा मजबूत, समाजासाठी धरपड करणारा व चांगला नेतृत्व करणारा कार्यकर्ता मिळाला आहे.त्यांच्या प्रयत्नाने येणाऱ्या दोन महिन्यात टेमेश्वर नगर येथील 400 लोंकाच्या मालकी जागेवरचा साशन हटणार आहे. यांनी या समाज कार्यासाठी शिवसेना पाठीशी राहिल.शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख,मोहोड काका  ढाणकी येथे शिवसेना संपर्क कार्यालय उघडले असून शिवसेना पदअधिकारी हे नागरिकांसाठी उपलब्ध राहून ऑनलाईन ऍप द्वारे आपली समस्या महाराष्ट्राचे बहिणीचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पाठवतील त्यामुळे जनसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील.शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख यशवंत पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}