देश

उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंड मुरली येथे जवळपास सहा एकर ऊस जळून खाक

ढाणकी प्रतिनिधी ::- असिफ खान पठाण मुरली येथील बेबीबाई शामराव जाधव याच्या शेतातील मुरली पाणंद रस्त्यावरील सुमारे सहा एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना गुरुवार दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. ऊसाचे क्षेत्र सलग लागून असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. संपूर्ण ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. ऐन ऊस तोडणी हंगामाच्या तोंडावर ही घटना घडली आहे. तोडणीला आलेला इतक्या मोठ्या प्रमाणातील क्षेत्रातील ऊस खाक झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. येथील गट नं 32/2 बेबीबाई शामराव जाधव मधील ऊस जळाला आहे.

गुरुवारी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान अचानक ऊसाच्या फडाला आग लागली. यावेळी आगीने रौद्र रूप धारण केले होते. बघता बघता सर्वत्र आग पसरली. सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत होते. ऊस तोडून व पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी प्रयत्न केला.आग लागण्याचे कारण अद्याप कळले नाही असे शेतकरी आणि ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}