देशराजनीति

खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या झंझावता पुढे विरोधक गार- संतोष पुलेवार पोटेकर..

हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या झंझावात पुढे विरोधक गार झाले असून हजारो निष्ठावंत शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आ.माधवराव पाटील जळगावकर यांना निवडून आणण्यासाठी मोठ्या जोमाने प्रचारासाठी रस्त्यावर उतरले असून नक्कीच माधवराव पाटील जळगावकर यांचाच विजय होणार असल्याचे मत संतोष पुलेवार पोटेकर माजी सरपंच तथा शिवसेना तालुका समन्वयक यांनी बोलताना सांगितले आहे..

     सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे.मात्र यावेळीच्या विधानसभा निवडणुकीला चांगलाच रंग आलेल्या असुन संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे या निवडणुकीने लक्ष देवून घेतल्याचे दिसून येते असुन महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तसेच आप आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रस्त्यावर उतरून पुर्ण ताकदीने प्रयत्न करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच प्रमाणे नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर विधानसभा सुद्धा चांगलीच रंगलेली असुन या विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागलेले असल्याचे पाहायला मिळत आहे.येथिल माहाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचारासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या झंझावात पुढे विरोधक गार झाल्याचे संतोष पुलेवार पोटेकर यांनी सांगितले आहे.तसेच हदगाव हिमायतनगर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हजारो निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावर उतरून आमदार माधवराव पाटील जळगावकर यांचा जोरदार प्रचार करत आहेत आणि आमदार माधवराव पाटील जळगावकर यांना निवडुन आणण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते मैदानात उतरले आहे आणि पुन्हा एकदा हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार म्हणून माधवराव पाटील जळगावकर यांनाच निवडुन आणणार असल्याचे संतोष पुलेवार पोटेकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना असे मत व्यक्त केले आहे.यावेळी पोटा (बु) ग्रामपंचायत सदस्या सौ.आश्विनी पुलेवार, महिला आघाडी शिल्पा ताई राठोड , प्राजक्ता गुंडेकर,संदिपराव देशमुख पोटेकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश पाटील सोनारीकर,गजानन पाटील सूर्यवंशी,रामभाऊ गुंडेकर,कपिल पाटील हराळे,प्रल्हाद पाटील सुर्यवंशी,दिपक चव्हाण, गजानन आबुंलगे,बंडू पाटील वडगावकर,पत्रकार आनंदराव जऴपते, साहेबराव पंतगे, गोविंद पाटील करंजीकर,ओम पाटील पारवेकर, संतोष राठोड, रघुनाथ शेळके, तुकाराम आडे, साहेबराव राठोड,विलास शेळके,पवन कदम टाकराळेकर,सत्य प्रकाश देशमुख, संतोष भिम्मरवाड,शिवानंद बोड्डेवार, अविनाश राठोड, भगवान पाटील दुधडकर,वैभव पवार, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष सय्यद युनुशभाई, शेख निसार,,विशाल आललवाड, रामभाऊ गुंडेकर,अजिंक्य पिन्नलवार, विश्वनाथ वानोळे, मनोहर आलेवार,,गणेश शहापुरे, भगवान घुमनर, शेख युसुबभाई, शेख मुजीप शेख हमजा, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}