(शंकर बरडे )हिमायत्तनगर तालुक्यातील ग्रामपंचायत आंदेगाव अंतर्गत येणारे पुनर्वसित आंदेगाव (पक्षिम) या गावाचे १९८३ साली महापुरामुळे गावाचे पुनर्वसन करण्यात आले.गावातील सर्व नागरिकांना शासनाकडून मोबदला देण्यात आला परंतु काही स्थानिक लोकप्रतिनी व प्रशासनाकडून सदरील गाव हे स्थलांतरीत नाही असे सांगून गावातील जास्तीत जास्त निधी हे जुना आंदेगाव येथे वापरत आहेत.शासन परिपत्रकानुसार पुनर्वसित गावातील नागरिकांसाठी खालील प्रमाणे काळजी घेणे अनिवार्य आहे.गावातील काही कुटूंबाचे पुनर्वसन झाले असेल तर ग्रामपंचायत स्थरावर त्यांना प्रत्येक सुविधामध्ये प्राधान्य देणे अनिवार्य आहे.यवढेच नाही तर,बालक, प्रौढ किंवा वृद्ध व्यक्तीला दैनंदिन क्रियाकलापांमध्ये शक्य तितके स्वतंत्र होण्यास मदत करणे.शिक्षण, काम, मनोरंजन आणि कुटुंबाची काळजी घेणे यासारख्या अर्थपूर्ण जीवनातील भूमिकांमध्ये सहभाग घेण्यास सक्षम करते. अंतर्निहित आरोग्य परिस्थिती आणि त्यांची लक्षणे संबोधित करण्यासाठी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबासोबत काम करणे, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचे वातावरण सुधारणे, सहाय्यक उत्पादने वापरणे, स्वयं-व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी शिक्षण देणे, आणि कार्ये अधिक चांगल्या प्रकारे पार पाडणे.सुरक्षितपणे आणि स्वतंत्रपणे. एकत्रितपणे, या धोरणांमुळे एखाद्या व्यक्तीला मदत करणे. ग्रामपंचायत स्थरावरील जास्तीत जास्त निधी पुनर्वसित गावाला पुरवणे पण या सर्व गोष्टीपासून आम्हा पुनर्वसित नागरिकांना वंचित ठेवले जाते असे माझी सैनिक सुभेदार चिमनाजी थोटे यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.
पुनर्वसित आंदेगाव (पक्षिम ) येथील ग्रामस्थांच्या मनण्यनुसार तलाठी कार्यालय आंदेगाव( पक्षिम) येथे बांधण्यात यावे,अशी मागणी सातत्याने होतं होती परंतु आम्ही ग्रामस्थांनी विचार पूस केली तेव्हा तुमचे आंदेगावचे (पाक्षिम ) पुनर्वसन रद्द करण्यात आले आहे त्यामुळे काही राजकीय नेते व प्रशासनाच्या संगमताने जुने आंदेगाव येथेच तलाठी कार्यालय बांधण्यात येणार आहे असे सांगण्यात येत आहे.तलाठी कार्यालय पुनर्वसित आंदेगाव (पक्षिम ) याच ठिकाणी त्यांचे बांधकाम करण्यात यावे अन्यथा असे न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने येत्या २६ जानेवारीला हिमाय्तनगर येथील तहसील कार्याल्यासमोर आमरण उपोषण करणार असे निवेदनाच्या पत्रात सुभेदार चिमनाजी थोटे (से.नि )यांनी इशारा दिला आहे.