कार्यकारी संपादक शंकर बरडे/हदगांव-हिमायतनगर विधानसभेच्या पार्शभूमीवर होणाऱ्या निवडणूकीच्या अनुषंगाने आज रोजी हिमायत्तनगर येथे आदिवासी समाज बांधवाची बैठक पार पडली.
येणाऱ्या विधानसभेला हदगाव हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी सर्वांनुमते उच्चं शिक्षित व सक्षम असा एक आदिवासी उमेदवार उभा करणार असे हिमायतनगर येथे झालेल्या बैठकीत निर्णय झाला असून तालुक्यातील सर्व आदिवासी कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.हदगांव हिमायत्तनगर तालुक्यात आदिवासी समाजाचे मतदान हे निर्णायक मतदान म्हणून याकडे पाहिले जाते,पण कुठलाही पक्ष हा आदिवासी समाजाला उमेदवारी तर सोडूनच द्या पण आदिवासी समाजाचा विचार सुद्धा करायला तयार नाहीत.हदगांव व हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी समाजाचे मतदान जवळपास ५०,००० हजारांच्या घरात असून सुद्धा या समाजाचा फक्त मतदानापुर्ताच वापर होतो असे चित्र प्रत्येक निवडणूकिला दिसून येते. तालुक्यातील तेने मंडळीचा भ्रम आहे कि हा आदिवासी समाज आमच्या दावणीला बांधलेला आहे,त्यामुळे आदिवासी समाजाचा जास्त विचार करायला कोणत्याही पक्षाकडे या नेतेमंडळीकडे वेळ नाही.या सर्व गीष्टी लक्षात घेता हदगांव हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी ठरवले आहे,कि आम्ही आमचा येणाऱ्या विधानसभा सभेच्या निवडणूकीला उमेदवार देऊन ते सर्व ताकतीने लढवू आणि निवडून अनु असे ठाम ठरविले आहे.या बैठकीस उपस्थित डॉ. डी. डी. गायकवाड,डॉ.शाम वाकोडे,डॉ. बळीराम भुरके, सत्यव्रत ढोले, डॉ. संजय धुमाळे, डॉ, मारोती वाकोडे,दत्तात्रय वाळके, कांताराव धुमाळे,एडॅ. रामदास डवरे, डॉ. शिवशंकर बुरकूले,सरपंच श्रीरंग देशमुखे, सरपंच सुनील शिरडे, उपसरपंच संजय माझळकर, सरपंच गंगाराम ढोले,डॉ. सत्यनारायण मुरमुरे, रामदास वाळके, चांदराव वानोळे, यादवराव डवरे,शेषेराव वाळकीकर, डॉ. जनार्धन टारपे,बापूराव डवरे,रामेश्वर ढोले,सखाराम वाकोडे,विशांबर वानोळे, डॉ. खुपसे दगडवाडी,वामन डवरे, अदी तालुक्यातील मोठया संख्येने समाज बांधवाच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.