देश
नांदेडमध्ये अज्ञात तरुणाने बस समोर उडी मारून आत्महत्या केली. नातेवाईकांनी वजिराबाद पोलीस स्टेशन येथे भेटावे पोलीसांचे आव्हान.
नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन समोर अंदाजीत २५-३० वयातील एका व्यक्तीने एसटी महामंडळ खाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिं ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० ते १२:०० च्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती वजीराबाद पोलीस स्टेशन येथे समजतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एसटी समोर उडी घेत आत्महत्या केलेल्या.
अज्ञात तरुणाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र संबंधित व्यक्तीची ओळख पटली नसल्याने मृत्यू अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला नांदेड येथील डॉ, शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे हलविण्यात आले आहे तरी या व्यक्तीचे मित्र नातेवाईक यांनी तात्काळ वजीराबाद पोलीस स्टेशन येथे यावे असे वजीराबाद पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल सोनटक्के यांनी सांगितले आहे