देश
वाळकेवाडी येथील बेबीताई वाळके बनली महाराष्ट्र पोलीस…
हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील रहिवाशी शेषेराव सोमाजी वाळके यांची मुलगी बेबीताई शेषेराव वाळके जिद्दीने शिक्षण घेत धाराशिव येथे महाराष्ट्र पोलीस म्हणून तिची निवड झाली आहे..शेषेराव वाळके हे वाळकेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी, त्यांना पाच मुली,एक मुलगा, पत्नी, नातवंड अशा मोठया परिवाराच ओझं डोक्यावर घरून चार मुलीचे लग्न केले व एका मुलीला जिद्दीने शिकून महाराष्ट्र पोलीस बनविले. शेषेराव वाळके यांची परिस्थिती जमतेम असूनसुद्धा ते खचून न जाता अशा हलाकीच्या परिस्थितीवर मात करून बेबीताई वाळके ही जिद्द,चिकाटी, मेहनत व अभ्यास मानसी अंगीकृत करत ,अनुसूचित जमातीच्या परवर्गातून धाराशिव जिल्ह्यात प्रथम आली व जिद्दीने अभ्यास व श्रम करत तिचे ध्येय तिने गाठले.समाज माध्यमात तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.