भोकर विधानसभा राजकीय शेत्रात खळबळ उडाली.
भोकर विधानसभा लढवण्याची घोषणा ट्रान्सजेंडर पायल यांनी केली.
भोकर प्रतिनिधी/आगामी विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघातून सर्व ताकदीने निवडणूक लढवण्याची घोषणा तृतियपंथीय कु.पायल मिराशेने दिं.१६ ऑगस्ट रोजी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.. येत्या काही दिवसांत पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे संकेत प्राप्त होताच विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, आदी प्रमुख पक्षांकडून उमेदवारांचा शोध सूरु आहे. सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भाजपाकडून उमेदवारी फायनल केल्याचे सांगण्यात येत आहे तर काँग्रेस पक्षांकडून डझनभर उमेदवार उमेदवारीवर दावा करत आहेत.आतापासूनच प्रतिस्पर्ध्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना दिसून येत आहेत. खा चव्हाणांनी आपल्या मुलीला प्रमोट करण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करत आहेत तर दुसरीकडे विरोधक तितक्याच ताकदीने खा. चव्हाणांचा विरोध करत आहेत. या कलगीतुऱ्यात ट्रान्सजेंडर पायलने उडी घेउन पत्रकार परिषदेत सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवण्याची घोषणा करताच दिग्गज राजकियांना अनपेक्षित धक्का बसला आहे. तृतीय पंथीयांना शिक्षण, नौकरीत आरक्षण मिळून समान संधी प्राप्त व्हावेत, पिण्याचे पाणी, रस्ते, विज, घाण पाण्याचे व्यवस्थापन यासाठी प्राधान्यक्रमाने प्रयत्न करण्यासाठी, गोरगरिबांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी विधानसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आपण तृतीयपंथी असलो म्हणून काय झाले? बाबासाहेबांनी सर्वांना समान हक्क आधिकार दिले आहेत त्याबळावर आम्हीही निवडणुक इच्छितो. येणारी विधानसभा निवडणुक कोणाला विरोध करण्यासाठी किंबहुना कुणाला पाडण्यासाठी नाही तर अस्मितेसाठी लढणार असल्याची भावना पायलने पत्रकार परिषदेत मुक्तपणे व्यक्त केली.