संजीवनी हॉस्पिटल हिमायतनगर येथे दोन महिन्यापर्यंत विनामूल्य आरोग्य शिबिर सुरू.
तालुक्यातील संपूर्ण नागरिकांनी याचा लाभ घ्यावा:डॉ प्रेम वाघमारे.
विशेष प्रतिनिधी विकास गाडेकर
हिमायतनगर शहरामधील संजीवनी हॉस्पिटल येथे सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी प्रथमच मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी तालुक्यातील संतालुक्यातील संपूर्ण नागरिकांनी याचा लाभ घ्यावा:डॉ प्रेम वाघमारे.पूर्ण नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा डॉ प्रेम वाघमारे यांचे आव्हान.तालुक्यातील संपूर्ण नागरिकांनी याचा लाभ घ्यावा:डॉ प्रेम वाघमारे.
सध्या पावसाळ्याला सुरुवात होवून जवळपास दोन महिने होत आले असून पावसाळ्यात अनेक जण आजारी पडत असतात आणि सर्व सामान्य गोरगरीब जनतेला वेळेवर उपचार ही मिळत नसल्याचे डॉ प्रेम वाघमारे यांनी लक्षात घेत “रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा” असे मानत आपल्या परिसरात गोरगरीब रुग्णांसाठी होईल ते करण्याचा निर्मळ विचार मनात बाळगुन हिमायतनगर येथील संजीवनी हॉस्पिटल येथे प्रथमच मोफत आरोग्य शिबिर विनामूल्य उपचार देण्याचे आयोजित करण्यात आले आहे सदर शिबिर दिनांक २१ जुलै रोजी पासून पुढील दोन महिन्यापर्यंत सकाळी ९:०० ते रात्री ९:०० पर्यंत टाईफॉईड, डेंगू, मलेरिया, पेशी कमी जास्त होणे, ताप, सर्दी खोकला, वाताचे आजार, मान्सुनमध्ये उद्भवनारे व्हायरल फिवर, त्वचेचे आजार फंगल इंन्फेक्शन व स्त्रियांचे विविध आजारवर कसलीही फिस न घेता मोफत उपचार केला जाणार असल्याचे डॉ प्रेम वाघमारे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे तसेच या मोफत आरोग्य शिबिराचे हिमायतनगर तालुक्यातील संपूर्ण नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे