देश
कोल्हापूरवर महापुराची टांगती तलवार; पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली.
मुख्य कार्यकारी संपादक/कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुराचे संकट नाकारता येत नाही आहे.
या वर्षीच्या पावसाळ्याला सुरुवात होवून जवळपास दोन महिने होत आले आहे व मागिल तीन दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत क्षमतेपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी ४० बंधाऱ्यावर नदीचे पाणी येवून ६० हून अधिक थेट संपर्क तुटल्याने या गावांना पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे