हिमायतनगर तालुक्यात अवैध देशी विदेशी दारूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू – मात्र पोलीस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष.
विशेष प्रतिनिधी विकास गाडेकर
हिमायतनगर शहरातून खेड्यापाड्यात अवैध देशी विदेशी दारूचा पुरवठा सहज उपलब्ध होत असल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये देशी विदेशी दारू ची विक्री मोठ्या प्रमाणात चढा दराने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या दारू विक्रीमुळे मध्यपीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन सर्वसामान्य नागरिकांना मध्यपीचा प्राशन करणाऱ्या कडून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.परंतु तालुक्यात अवैध देशी विदेशी दारूचा पुरवठा करुन सहज उपलब्ध करणाऱ्या वर पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे तसेच हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील बऱ्याच गावांमध्ये देशी विदेशी दारू विक्रीचा धंदा मोठ्या प्रमाणात होत आहे.व गावात सहजरीत्या अवैध देशी दारू उपलब्ध होत असून गावागावात अवैध दारू विक्री करणारे ठाण मांडून अवैध देशी विदेशी दारू विक्री करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे तरी पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभाग यांनी याकडे तात्काळ लक्ष देवून तालुक्यात अवैध देशी विदेशी दारू उपलब्ध करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.