हिमायतनगर येथील नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे बेहाल
हिमायतनगर येथील जनतेचे बेहाल नगरपंचायत प्रशासन मात्र खुशाल
नांदेड जिल्हा प्रतिनिधी अजिम हिंदुस्थानी
हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य पावसाळ्याच्या सुरुवातीला पसरले असून शहरातील प्रत्येक मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे संपूर्ण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या खड्यावर येतील नगरपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील व तालुक्यातील खेड्यापाड्यातील शहराच्या ठिकाणावरून येत असलेल्या नागरिकांना या खड्ड्यांचा व रस्त्यावर नाल्यांचे घाण पाणी येत असल्यामुळे या घाणीच्या साम्राज्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे हिमायतनगर शहरात मागील काही महिन्यापासून हर घर जल हर घर नल अशी योजना राबविण्यात येत असून या योजनेकडे संबंधित पाणीपुरवठा विभागाचे व संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष असल्यामुळे शहरात झालेल्या विकास कामाची संपूर्ण रस्त्याची दुर्दशा होत असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे सदर पाणीपुरवठा योजनेच्या कामाची कालावधी शासनाच्या नियमानुसार सहा महिन्यात करून देणे हे बंधनकारक असताना सुद्धा शहरातील मुख्य रस्त्यांचे खोदकाम संबंधित ठेकेदार जवळपास एक वर्षापासून येथील पाणीपुरवठा योजनेचे काम पावसाळ्यातही करत असल्यामुळे शहरातील सगळेच रस्ते चिखलमय झाल्यामुळे शहरांमध्ये अनेक दुचाकी घसरून पडत असल्याचे घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे तसेच शहरातील अनेक वार्डातील नाल्यातील घाणीची साफसफाई कडे येथील नगरपंचायत चे संबंधित अधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहेत तर दुसरीकडे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी हे जाणीवपूर्वक हर घर जल हर घर नल या योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तरी लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासन पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी तात्काळ या सर्व समस्यांवर लक्ष देण्याची मागणी हिमायतनगर शहरातील नागरिकांमधून केली जात आहे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी अजिम हिंदुस्थानी