मोरगाव टाकराळा परिसरातील शेतकऱ्यांना ८ तास ३ फेज लाईट सुळसुळीत करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन..
हिमायतनगर तालुक्यातील मोरगाव टाकराळा परिसरातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून ३ फियुज लाईट फक्त ५ तास मिळत असुन ते लाईट या भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील कामे करण्यासाठी अपूर्ण होत असल्याने येथील शेतकऱ्यांना ३ फियुज लाईट अभावी हेळसांड होत आहे तरी पुर्णतः 8 तास देण्यात यावी असे येथील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय सरसम येथे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.तसेच वडगाव परिसरात चार ते पाच डिपीला १६ तास तास लाईट मिळत आहे तरी त्याच प्रमाणे येथील डिपीच्या लाईटची दुरुस्ती करून ८ तास लाईट देण्यात यावी,व येथील काम दोन दिवसात पुर्ण करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिं ५ नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी नितीन राठोड भिकू आडे बाबू जाधव वसंत राठोड अविनाश जाधव अमोल आडे केशव पवार आपाराव आडे खंडू पावडे शैलेश गिरी बाळू खंदारे उपस्थित होते