ढाणकीत प्रचाराच्या झंजावातला सुरुवात !
ढाणकी प्रतिनिधी:असिफ पठाण/महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, मतदार संघात प्रचाराचा झंजावात हा मोठ्या प्रमाणात सुरू असून, मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांच्या सभा सध्या मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, आपापल्या पक्षाची री ओढताना दिसत आहेत. हा प्रचाराचा झंजावात ढाणकी शहरात सुद्धा सपाटून सुरू झालेला दिसून येत आहे. शहरातील वेगवेगळ्या प्रभागात, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते प्रचार प्रसार करताना मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
महेश पिंपरवार यांचे नेतृत्वात महायुतीचा प्रचार जोरात.भारतीय जनता पक्षाचे ढाणकी शहराध्यक्ष महेश पिंपरवार यांनी, विधानसभा प्रचारासाठी चांगलीच कंबर कसली असून, पक्षातील ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते, लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल व पदाधिकाऱ्याला सोबत घेऊन ते, डोअर टू डोअर प्रचार करण्यात व्यस्त आहेत. यावेळी “लाडकी बहिण योजना” ही गेम चेंजर ठरणार असेही मतदार बोलून दाखवताना दिसत आहेत.