वाळकेवाडी बनले तज्ञ डॉक्टरांचे माहेर घर…
(शंकर बरडे )हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बहुल गाव म्हणून ओळखले जाणारे वाळकेवाडी हे गाव.गावातील बहुतांश डॉक्टर विद्यार्थांनी आदिवासी शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेत आपले आपल्या वडिलांचे व गावाचे नामलौकिक करत एक नामांकित तज्ञ डॉक्टर म्हणून राजधानीत सुद्धा आपली छाप टाकली आहे.आगरी समाज म्हटले की पदवीपर्यंतचे शिक्षण मुल कसेबसे पूर्ण करतात. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत मुले उच्च शिक्षण घेतात. वाळकेवाडी गावातील डॉक्टरांनी मात्र एक वेगळाच आदर्श सर्व समाजापुढे निर्माण करत MD पर्यंत शिक्षण घेत एक आदर्शत्व निर्माण केले आहे. त्यांच्या कामाची पोचपावती आणि इतरांना त्यातून प्रेरणा मिळत आहे.गावातील बहुतांश कुटुंब शेत-मजुरी व शेती करत उपजीविका भागवतात. मात्र शिक्षणाचे महत्व ओळखून ग्रामस्थांनी मुला-मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण दिले. परिणामी या गावात २० विद्यार्थी वैद्यकीय पदव्या मिळवून तज्ञ डॉक्टर झाले आहेत. थोडक्यात डॉक्टरांचा परिचय म्हणून सांगायचे झाले तर डॉ. उत्तम पागोजी धुमाळे (MBBS.MD)बालरोग तज्ञ,डॉ.रोहिणी दत्तात्रय वाळके (MBBS.MD) मधुमेह तज्ञ,डॉ.विजय दत्तात्रय वाळके(MBBS.MD)छाती विकार तज्ञ,डॉ.प्रशांत खोबाजी वाळके (MBBS.MD)मेंदू व हृदय रोग तज्ञ, डॉ.संजय प्रभातकर धुमाळे (MBBS.MD ) नेत्ररोग तज्ञ डॉ.रविकुमार गणपत वाळके (MBBS.MD)भूलतज्ञ, डॉ. चारुशीला नामदेव डुडुळे (MBBS MD) नेत्ररोग तज्ञ, डॉ.ऋतुजा कांताराव धुमाळे (MBBS MD)नेत्ररोग तज्ञ, डॉ. देविदास वाळके ( वैद्यकीय अधिकारी ), डॉ. विजय भास्कर धुमाळे (वैद्यकीय अधिकारी),डॉ.प्रमोद दत्ता कऱ्हाळे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. प्रीती प्रभाकर वाळके BAMS, डॉ. राजकुमार खोबाजी वाळके, दंतरोग तज्ञ,डॉ. पूनम बापूराव वाळके दंतरोग तज्ञ,डॉ. किमती उत्तम धुमाळे MBBS,डॉ.किमया उत्तम धुमाळे MBBS,डॉ.साक्षी सुभाष धुमाळे MBBS,डॉ. तन्मय सत्यनारायण मुरमुरे MBBS डॉ. ऋणाली सुभाष धुमाळे BAMS आदी,आज सुद्धा या गावातील बरेशः विद्यार्थी डॉक्टर बनण्याच्या प्रतीक्षेत आहेत.