देश
पळसपुर येथील लहान बालकांचे अश्रू लोकप्रतिनिधी पुसतील का ?
प्रतिनिधी दाऊ गाडगेवार/हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथील मागील चार पाच महिन्यांपासून विजपुरवठा वारंवार खंडीत होत असून येथील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणचे अधिकारी राम चव्हाण यांना भ्रमणध्वनीद्वारे विद्युत पुरवठा का खंडीत होतो या विषयी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. मागील एक महिन्यांपासून पळसपुर येथील काही मोजक्याच घरांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने लहान बाळ आजारी पडत असून रात्र रडत काढावी लागत आहे. लहान बालकांचे रात्रीला डोळ्यातून येणारे अश्रू बघून पालकांनाही अश्रू अनावर येत आहेत. लहान बालकांना रात्रीला डासांचा होणारा त्रास आणि डोळ्यातून येणारे अश्रू लोकप्रतिनिधी पुसतील का ? असा सवाल अंधारात रात्र काढणारे लहान बालकांचे पालक लोकप्रतिनिधींना विचारत आहेत.