कै.शेषेराव दत्तराव माने यांच्या आठव्या पुण्यस्मरणा निमीत्त पोटा येथे गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संगीतमय भजनाचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन..
हिमायतनगर/प्रतिनीधी हिमायतनगर तालुक्यातील मौजे.पोटा बु येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे आदर्श व्यक्तीमत्व समाजात जन्मणार्या प्रत्येक व्यक्तिला समाजाचे काही देणे आसते आणी ते प्रत्येकांनी दिले पाहिजे या सिद्धांतावर जगलेले पोटा नगरीचे पोस्ट मास्टर कै.शेषेराव दत्तराव माने यांची दिं.26/11/2024 रोजी आठवी पुण्यतिथि मौजे.पोटा येथे आयोजित केली आहे .पोटा परिसरात सुपरिचित असलेले व शुन्यातुन विश्व निर्माण करणारे पोस्ट मास्तर या पदावर असुन सुध्दा एक सदन शेतकरी म्हणुन नाव लौकिक व उत्कृष्ठ शेतकरी म्हणुन अनेक वेळा तालुक्यात बहुमान मिळवणारे व तसेच हे करत असताना समाजसेवा तसेच गोरगरीबांना मदत करत आपल्या कुटुंबावर जिवापाड प्रेम करत कुटुंबाला सशक्त व कष्ठीची जान करुन देत घराची धुरा सांभाळत प्रगतीचा कळस गाठणारे घराला घरपण देणारे कै.शेषेराव दत्तराव माने यांचा जिवन संघर्ष अतिशय चांगला होता त्यांच्या पुण्यस्मरणा निमित्त मौजे .पोटा येथे ग्राम गिता प्रचारक तथा समाज प्रबोधनकार ह.भ.प.गोपाळ महाराज मुळझरेकर यांच्या अभंग वाणीतुन भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी पंचक्रोशीतील संगीत प्रेमी यांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन.श्री.गजानन शेषेराव माने पोटेकर कोंग्रेस तालुका उपाध्यक्ष हिमायतनगर व समस्त माने परिवार यांच्या वतीने करण्यात आला आहे.