अहो नेतेमंडळी साहेब थोड आमच्या गावाकडे ही लक्ष द्या हो..
पारवा (खुर्द) ते पोटा (बु) या रस्त्याची पावसाळ्याच्या सुरुवातीलाच झाली दुरवस्था.
विशेष प्रतिनिधी/हिमायतनगर तालुक्यातील पारवा खुर्द ते पोटा बु. या पुर्ण रस्त्याची पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दुरवस्था झालेली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पण त्यातच पारवा खु ते पोटा या तीन किलोमीटर रस्त्याची हालत अत्यंत खराब झालेली आहे. ते तुम्ही वरील चित्रामध्ये दिसत आहे. या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मुरुमाच्या नावाखाली माती असलेला मुरून टाकून जे.सी.बी.मशीन ने उकरून रस्त्याची आणखी दुरअवस्ता करून टाकल्यामुळे.येथील जर गावामध्ये एखाद्या व्यक्तीला तत्काळ उपचाराची गरज पडल्यास तो व्यक्ती या रस्त्याने जवळील रुग्णालयात खरच पोहचू शकेल का हा एक विचार करण्याजोगा प्रश्न सुशिक्षित नागरीकांमधुन उपस्थित केले जात आहे.तसेच
गावामधून काही शाळकरी मुला मुलीनां रोज हिमायतनगर ला शाळेसाठी पोटा फाट्या पर्यंत पायी चिखलामध्ये चालत याव लागते तरी मात्र कुठल्याही नेतेमंडळी चे याकडे लक्ष असल्याचे दिसून येत नाही यामुळे येथील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदार खासदार यांनी याकडे तात्काळ लक्ष देवून येथील नागरिकांना होणाऱ्या नाहक त्रासाला थांबवावं अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे