देश

करंजी येथील बस स्टॅनड ते गावातील मंदिरापर्यंत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन-आ.माधवराव पाटील यांच्या हस्ते..

हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथील बस स्टॅन्ड ते गावातील मंदिरापर्यंत एक कोटी रुपयांचा सिमेंट रस्त्याचे नारळ फोडून भूमिपूजन आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले…

हिमायतनगर भोकर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे करंजी येथे दिं १४ ऑगस्ट रोजी बस स्टँड ते गावातील मंदिरापर्यंत सिमेंट रस्त्याची मागणी मागील काही महिन्यापूर्वी करंजी येथील काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी व करंजी नगरीचे सरपंच बालाजी पट्टेवाड यांनी हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे मागणी करण्यात आली होती तसेच आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी करंजी बस स्टॅन्ड ते गावातील मंदिरापर्यंत रस्त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून नारळ फोडील असे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे आज दिं १४ ऑगस्ट रोजी आपल्या शब्दावर ठाम राहून येथील रस्त्यासाठी एक कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून बस स्टँड ते गावातील मंदिरापर्यंत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे रस्त्याचे भूमिपूजन झाल्यानंतर करंजी येथील ग्रामस्थांनी व तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांचे आभार मानले असता करंजी येथील विकास कामासाठी मी कधीच निधी कमी पडू देणार नाही करंजी माझी आहे आणि माझीच राहणार असे आमदार माधवराव पाटील यांनी बोलताना सांगितले आहे.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सदस्य सुभाष दादा राठोड, मा.सभापती प्रकाश वानखेडे, शिवाजी माने वाघीकर बाळा पाटील टाकराळेकर, उ,बा,मा, संचालक नासर पठाण, सरपंच बालाजी पुट्टेवाड, उपसरपंच शब्बीर पठाण,पवन पाटील टाकराळेकर,विकास गाडेकर, श्रीदत्त पाटील सोनारिकर पांडुरंग सूर्यवंशी, निरंजन जाधव, रामकिशन सुनकरवार,अरुण गाडेकर, नारायण सूर्यवंशी. रामराव परभणकर, शेमू पटेल, किशोर कोणप्रतवार,उत्तम पुठेवाड,चादराव गाडेकर, गजानन गाडेकर, माधव गाडेकर, तानाजी गाडेकर, वसंता गाडेकर मारोती गाडगेराव,यावेळी गावकरी मंडळी उपस्तित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}