प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीला अखेर यश..
शैक्षणिक सत्र 2024-25 पासून ९ वी चा वर्ग होणार सुरू जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांचे आदेश.
ढाणकी प्रतिनिधि असिफ पठाण/जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा ढाणकी या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गाची पटसंख्या ४०० च्या जवळपास आहे. सदर शाळेची केंद्र शासनाच्या पी.एम. श्री उपक्रमात अंतर्गत निवड झालेली आहे. पालक वर्ग व गावातील शिक्षक प्रेमी यांनी सदर अनेक दिवसापासून शाळेत नववी चा वर्ग सुरू करावी ही मागणी लावून धरली होती.
सदर मागणीकडे प्रशासनाने अनेक वेळा दुर्लक्ष केले ही बाब प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन सदर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उर्दू यामध्ये इयत्ता नववी चा वर्ग सुरू करावे अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला.
त्यानंतर प्रशासनाची कुठलीही हालचाल न दिसल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सय्यद माजिद व उमरखेड शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी दिनांक १३ ऑगस्ट रोजी पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक उमरखेड येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे होत तात्काळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उर्दू ढाणकी या मध्ये इयत्ता नववी चा वर्ग शैक्षणिक सत्र 2024- 25 पासून सुरू करावे असे आदेश जिल्हा शिक्षण विभागाचे प्रमुख यांनी सदर शाळेच्या मुख्याध्यापकाला दिला.
त्यामुळे आता जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा ढाणकि यामध्ये नववीचा वर्ग सुरू होऊन शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच उत्तम असे शिक्षण मिळणार असल्याने सर्व पालक वर्गात आनंदाचे वातावरण असून प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख सय्यद माजीद व शहर प्रमुख राहुल मोहितवार यांचे त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.