देश

ढाणकी येथील बंद केलेले नायब तहसील कार्यालय पूर्ववत करा. – रोहित वर्मा

ढाणकी/ प्रतिनिधी आसिफ पठाण

ढाणकी व बंदी भाग परिसराचा विचार करता सन १९९७ मध्ये प्रशासनाने उमरखेड तहसील वरचा भार कमी करत, ढाणकी येथे नायब तहसील कार्यालय कार्यान्वित केले होते. यामुळे ढाणकी व बंदी भागातील नागरिकांचे शासकीय कामे विना विलंब होत होती. परंतु अचानकपणे येथील नायब तहसील कार्यालय बंद केले गेले. हे कार्यालय बंद झाल्याने ढाणकी व बंदी भाग परिसरातील जवळपास ४० खेडे गावच्या नागरिकांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करून उमरखेड गाठावे लागत आहे. आणि या कामासाठी बंदी भागातील खरबी , दराटी या शेवटच्या टोकावरील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. कधी कधी तर त्यांचा त्या कामासाठी संपूर्ण दिवस हा उमरखेड येथे गेल्याने काही नागरिकांना उमरखेड बस स्टँड वर झोपण्याची वेळ सुद्धा आलेली आहे. ढाणकी व बंदी भाग परिसरासाठी अत्यावश्यक असलेली शासकीय व्यवस्था, जर ढाणकी या ठिकाणी नायब तहसील कार्यालय झाले तर यामुळे ढाणकी व बंदीभाग परिसरातील नागरिकांचा वेळही वाचेल , वेळेत कामेही होतील आणि तहसील वरचा अतिरिक्त भार सुद्धा यामुळे कमी होईल.या मागणीचा प्रशासनाने व शासनाने गांभीर्याने विचार करून, ढाणकी व बंदी भाग परिसरातील जनहितांचा सन्मान करून, ढाणकी येथे नायब तहसील कार्यालय लवकरात लवकर सुरू करून, सदर नागरिकांना उपकृत करावे अशा आशयाचे निवेदन, जिल्हा महामंत्री भारतीय जनता युवा मोर्चा पुसद रोहित वर्मा यांनी आज तहसीलदार उमरखेड व उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना दिले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, यवतमाळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनासुद्धा हे निवेदन पाठवले आहे.याप्रसंगी वैभव कोठारी भाजपा उमरखेड तालुका सचिव ग्रामीण,नागेश रातोळे भाजपा ढाणकी शहर उपाध्यक्ष,गणलेश गांजरे ढाणकी भाजप सचिव,राजु दोंतुलवार, विनायक अक्कावर बूथ प्रमुख भाजपा ढाणकी,पप्पू निम्मलवाड व परमेश्वर इंगळे हे उपस्थित होते.

 

 

 

ढाणकी येथे नायब तहसील कार्यालय चालू करणे हे शासन स्तरावरचे काम जरी असले तरी, ते ढाणकी व बंदी भागाच्या हिताचे व अत्यंत महत्त्वपूर्ण काम आहे. यासाठी मी स्वतः शासन स्तरावर प्रयत्न करणार आहेच, परंतु प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा याचा पाठपुरावा करावा अशी अपेक्षा आहे.तसेच ढाणकी येथे पूर्ण वेळ नायब तहसील कार्यालय चालू होईपर्यंत, आठवड्यातून दोन दिवस का होईना ढाणकी येथे नायब तहसील कार्यालय चालू करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}