बाळासाहेब टिकेकर यांची अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड..
मुख्य कार्यकारी संपादक शंकर बर्डे
भोकर येथील लोक स्वराज्य आंदोलनांच्या माध्यमातून समाजकार्य करणारे बाळासाहेब रामराव टिकेकर यांची यावेळेस साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती मंडळाच्या भोकर तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे.
बाळासाहेब टिकेकर तळागाळातील जनतेला आपल्या संघटनाच्या माध्यमातून न्याय मिळून देण्यास नेहमीच प्रयत्नशील असतात. सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर अशी भूमिका बजावतांना दिसतात त्यामुळे त्यांना साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळाची तालुक्याची जीमेदार त्याच्यावर सोपावली आहे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिन दलीत कष्टकरी वर्गासाठी खूप मोठे कार्य केले. त्याचप्रमाणे मातंग समाजाचा उद्धार करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. अशा साहित्यसम्राट लोकशाहीर क्रांतीसुर्य महामानवाच्या जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रामराव टिकेकर यांची सर्व मतानिशी निवड करण्यात आली आहे.