समाज बांधवांच्या उपस्थित: सेवानिवृत्त शिक्षक यादवराव वाळके यांचा सपत्निक सत्कार..
मुख्य कार्यकारी संपादक शंकर बरडे
हिमायतनगर येथील मौजे वाळकेवाडी येथील रहिवाशी यादवराव शंकरराव वाळके हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था(ITI) हिमायतनगर येथे गणित चित्रकला निदेशक या पदावर कार्यरत होते.त्यांच्या शिक्षण सेवेत असतांना त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडून गेले.
अतिशय शांत संयमी म्हणून कर्मचारी वर्गात त्यांची ख्याती होती.यापूर्वी श्री यादवराव वाळके यांनी किनवट, परभणी अशा विविध ठिकाणी अतिशय उत्तमरीत्या ज्ञान देण्याचे काम केलेले होते. आज त्यांच्या सेवानिवृत्ती च्या समारंभासाठी त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारी अधिकारी,कर्मचारी आणि नातेवाईक मंडळी हिमायतनगर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे हजर होती. सदरील कार्यक्रमासाठी प्राध्यापक परगणे सर, कोठुळे साहेब, वाळकीकर साहेब, नामदेवराव डूडुळे, डॉक्टर डी डी गायकवाड, रामदास वाळके, संजय माजळकर आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील सर्व कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि साहेबावर प्रेम करणारी सर्व आप्तेष्ट मंडळी हजर होती.या सर्वांनी यादवराव शंकराव वाळके यांना सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या परिवारासह पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…