देशक्राइम

झाडे नसतांना सुद्धा सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने टँकरद्वारे पाणी देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस..

सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी सोनारी परिसरात फिरतच नसल्याचा आरोप.संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी..

हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथील शिव पांदन रस्त्यावर झाडे नसतांना सुद्धा सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने टँकरद्वारे पाणी देत असल्याचा धक्कादायक प्रकार सोनारी येथील नागरिकांनी उघडकीस आणला आहे..

हिमायतनगर तालुक्यातील पारवा खुर्द,पोटा खुर्द,पोटा बु, जवळगांव बळीराम तांडा अश्या गावांना जोडत सोनारी गावालाही जुळलेला पांदन रस्त्यावर एकही झाड नसतांनाही सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने टँकरद्वारे पाणी देत असल्याचा धक्कादायक प्रकार दिं १७ डिसेंबर रोजी सोनारी येथील शेतकऱ्यांनी उघडकीस आणले आहे सामाजिक वनीकरण विभागाला शासनाकडून लाखों करोडो रुपयांचा निधी झाडे लावुन झाडांची वाढ होईपर्यंत देखभाल करण्याची जबाबदारी असते मात्र सामाजिक वनीकरण विभागाचे संबंधित अधिकारी कर्मचारी हे मनमानी कारभार करत शासनाकडून झाडे लावुन झाडांची वाढ होईपर्यंत देखभाल करण्यासाठी आलेल्या निधीचा गैरव्यवहार करत झाडे लावण्याचा दिखावा करत काही ठिकाणी झाडे लावून झाडांची देखभाल करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी झाडे न लावता तर झाडे नसलेल्या ठिकाणी पाणी टाकत वाया घालत असल्याचे चित्र सोनारी येथील शेतकऱ्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून उघडकीस आणुन संबंधित वनीकरण विभागाचे अधिकारी दिनकर पाटील,यांना भ्रमणध्वनी वरुन सविस्तर माहिती दिली असता यांच्या कडून उडवाउडवी चे उत्तरे देवून टाळाटाळ करीत दुर्लक्ष करीत असल्याचे सांगितले जात आहे व शासनाच्या लाखों रुपयांचा निधी झाडे लावुन झाडांची देखभाल करण्याच्या नावाखाली लाखों रुपयांचा निधीत गैरव्यवहार करत असल्याचे सोनारी येथील शेतकऱ्यांमधून बोलल्या जात आहे तरी लवकरात लवकर संबंधित वरिष्ठ अधिकारी तात्काळ याकडे लक्ष देवून येथे होत असलेल्या शासनाच्या गैरव्यवहार प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे अन्यथा लवकरच रितसर निवेदन देवून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देशोन्नतीशी बोलताना सांगितले आहे.

चौकट…
सामाजिक वनीकरण विभागाला शासनाकडून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून नियमानुसार जी रस्त्याच्या कडे लावले झाडे त्यांचा संगोपन करण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात येथील अधिकारी अतिशय या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचे पाहायला मिळत असून एकही झाड नसताना त्या ठिकाणी एक शासनाची दिशाभूल करत टँकर आणून पाण्याचा पुरवठा होत आहे. प्रत्येकी झाडाला जाळी लावणे त्यांना खताचा पुरवठा करणे पाणीपुरवठा करणे त्या झाडाला एक संरक्षण म्हणून मजुरदार ठेवणे निंदने अश्या प्रमाणे शासन प्रत्येक झाडावर खर्च करतो पण या ठिकाणी कुठलाही खर्च केलेला पाहायला मिळत नाही आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन येथील अधिकाऱ्यांची चौकशी करून यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांमधून केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}