अन्यायाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा सावित्रीबाईं फुले यांनी दिली – मीनाक्षी वाघमारे.
महिलांना शिक्षीत करुन अन्यायाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा सावित्रीबाईं फुले यांनी आम्हाला दिली पण आम्ही अन्यायी व्यवस्थेशी समझौता करुन गुलामीचे जीवन जगत आहोत म्हणून आमच्यावरील अन्याय अत्त्याचार वाढले आहेत असे विचार महिला समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षा सौ. मीनाक्षीताई नारायण वाघमारे यांनी व्यक्त केले.
राधीका नगर नांदेड येथे महिला समता परिषदेच्या वतीने आयोजित राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांच्या १९४ व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून सौ. मीनाक्षी वाघमारे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. संगीता राम जोगदंड ह्या होत्या. कार्यक्रमाच्या आयोजिका सौ. मंगल रमेश दुधंबे यांनी सुरेख सूत्रसंचलन केले.
आपल्या भाषणात सौ. वाघमारे पुढे म्हणाल्या की, आज आमच्यावर एवढे अन्याय वाढले आहेत की ते पाहता आम्ही संघटित होण्याऐवजी विखरुन जात आहोत. आमच्यातील संघर्ष शक्ती कुठे तरी कमी पडत आहे की काय असे वाटू लागले आहे. चळवळ दिशाहिन झाली आहे. यासाठी पुन्हा एकदा नव्या जोमाने संघटन शक्ती वाढवावी लागणार आहे. सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा मनापासून स्वीकार करुन त्याप्रमाणे वाटचाल करावी लागणार आहे.
यावेळी सौ. अनिता चंद्रप्रकाश देगलूरकर, सौ. मनिषा विठ्ठल कांबळे, सौ. पुष्पा जमनाजी डोंगरे, सौ. मंजुषा पद्माकर बाबरे, सौ. संगीता नामदेव फुलपगार, सौ. अनुसया हराळे, सौ. सुरेखा लिंबाजी अन्नपुर्वे, सौ. कलावती संभाजी कांबळे यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक सौ. सीमा नामदेव खंदारे यांनी केले.
सौ. सुजाता डोळस, सौ. मीना बालाजी फुलपगार, सौ. डिम्पल अभिषेक साळे, इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, भीमराव वाघमारे, श्रीनिवास कांबळे, बाळासाहेब जगताप आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दर महिन्याला एकत्र जमण्याचा व कार्यक्रम घेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.