नांदेड – देगलूरनाका भागातील रखडलेल्या विविध विकास कामा संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांच्यावतीने महापालिके समोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी भेट देवून सदरील मागण्याचे निवेदन मनपा प्रशासनाला देवून मागण्या तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या. या आंदोलनाची दखल घेत महापालिकेकडून बर्कत कॉम्प्लेक्स ते ज्ञानमाता हायस्कूल पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे प्रत्यक्ष आज सुरूवात झाले असून याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून महापालिकेचे आभार मानले जात आहे.
देगलूरनाका भागाातील रखडलेल्या विविध विकास कामा बाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे रऊफ जमीनदार यांनी पुढाकार घेत वेळोवेळी मनपा प्रशासनाकडे निवेदन दिले होते. परंतू महापालिकेकडून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येवून मंजूर झालेली कामे करण्यास चालढकल होत होती. त्यामुळे रऊफ जमीनदार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने महापालिके समोर शेकडो कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन सुरू केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी या आंदोलनास भेट दिली व देगलूरनाका भागातील विविध विकास कामा संदर्भात मनपा प्रशासनास ही कामे तात्काळ लक्ष घालून पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद देत बर्कत कॉम्प्लेक्स ते ज्ञानमाता शाळेस जाणार्या रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली. दि.4 जानेवारी रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रऊफ जमीनदार व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून या कामाला सुरूवात करण्यात आली. यावेळी निखील नाईक, लखनसिंघ लांगरी, पंकज कांबळे, सरफराज अहेमद, खदीर कुरेशी, सरदार भाई, सलमान भाई, वसीम भाई, कामरान खान, सलमान बिल्डर, अतिक बिल्डर, कपील ससाने, शेख जिलानी, शेख जब्बार मौलाना, कृष्णा पुयड यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.