देश

मोहपूर येथील शेतकरी अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी.

  1.  ( मुख्य कार्यकारी संपादक शंकर बरडे)

किनवट तालुक्यातील मोहपूर येथील शेतकरी सकाळी-सकाळी शेतातील कापूस व तूर या पिकांची पाहणी करायला गेलेल्या शंकर मधुकर आमले वय ३२ वर्षीय विवाहित युवा शेतकऱ्यावर दडा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक मागून येऊन हल्ला केला़ यामध्ये सदर युवक गंभीर जखमी झाला असून त्यांची प्रकृती चिंतजनक आहे.

ही घटना आज सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास मोहपूर जंगलालगतच्या आमले यांच्या शेतात घडली़

शंकर मधुकर आमले रा मोहपूर ता. किनवट जि नांदेड येथील रहिवाशी असून हा युवा शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेला असता शेता लगत असलेल्या जंगलात दडी धरून बसलेल्या अस्वलाने अचानक अंगारवर झेप घेऊन प्राणघात हल्ला केला आहे.

जेंव्हा अस्वलाने शंकर आमले यांच्यावर हल्ला केला तेव्हा त्याने प्रतिकार केल्यामुळे अस्वल जंगलाच्या दिशेने पळून गेले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या शंकर आमलेयांनी आरडावरडा केला तेव्हा आजूबाजूच्या शेजाऱ्यानी जखमी अवस्थेत त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय किनवट येथे दाखल केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}