एकंबा येथे सिकलसेल सोल्युबिलीटी कॅम्प संपन्न
(मुख्य कार्यकारी संपादक शंकर बर्डे)
हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील जिल्हा परिषद शाळा एकंबा येथे सिकलसेल सोल्युबिलीटी कॅम्प तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश पोहरे , वैद्यकिय अधिकारी डॉॅ. जर्नादन टारपे , तालुकास्तरीय तालुका सिकल सेल सहाय्यक श्री सुनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिं 25/जुलै/2024 रोजी घेण्यात आले या कॅम्प मध्ये 0 ते 40 वयोगटातील पुरुष व स्त्री यांची तपासणी करण्यात आली . सदर कॅम्प मध्ये तपासणी केलेली विद्यार्थी संख्या 110 होती सर्वाचे रक्त नमुने नकारात्मक आले असून सकारात्मक ची संख्या शुन्य होती.यावेळी आरोग्य मंदीर उपकेंद्र सिरंजनी येथिल आरोग्य सेविका श्रीमती लक्ष्मी निळकंठ तुप्तेवार ,आरोग्य सेवक श्री सय्यद ब्रदर,स्वंयसेवक खमरअली,अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती इंदु ताई धनगे,आशा स्वयंसेविका श्रीमती सत्वशिला काळे तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी उपस्थीत राहुन सिकलसेल कॅम्प यशस्वी झाले आहे.