देशखेल

शासकीय आश्रम शाळा दुधड येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त पारंपारिक सांस्कृतिक कलेचे सादरीकरण …

वाळकेवाडी :- जागतिक आदिवासी दिनानिमित्त दुधड-वाळकेवाडी येथे आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत येणारी शासकीय माध्यमिक व उच्चं माध्यमिक आश्रम शाळा दुधड येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जागतिक आदिवासी दिवसी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषण, गायन व आपल्या पारंपारिक संस्कृतीचे पालन करत आदिवासी वेषभुषा नटून अप्रतिम नृत्य सादरीकरण केले.

कर्यक्रमाची सुरुवात आदिवासी जण क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व सर्व महामानवाच्या प्रतिमांचे पूजन अध्यक्ष व प्रमुख अतिथी व मंचवर उपस्थित शिक्षक वृंदाच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत जागतिक आदिवासी दिनाचे महत्व तसेच आदिवासी महानायक यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.प्रास्ताविक व संचालन प्रा. सूर्यवंशी सर यांनी केले आपल्या प्रस्ताविकातून त्यांनी जागतिक आदिवासी दिन व ९ ऑगस्ट क्रांती दिन या बद्दल विशेष अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रभारी मुख्याध्यापक टी. आर अडबलवार सरांनी शिक्षणाचे महत्व समजावून तसेच महानायक बिरसा मुंडा यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.  विद्यार्थी शिक्षणामुळेच आदिवासी समाजाची प्रगती करू शकतात. महात्मा फुले व सावित्री बाई फुले तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजामध्ये शिक्षण क्रांती घडवली म्हणून सर्व समाजावर त्यांचे अनेक उपकार आहेत असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले व तरुण आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी समाजामध्ये क्रांती घडून आणून आदिवासी समाजाची प्रगती करू शकतात म्हणत आपले मोलाचे अध्यक्षीय भाषणचा समारोप करत कार्यक्रमला पूर्णविराम दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}