युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन..
नांदेड – अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारी संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ ही मजबूत संघटन आणि आपल्या कामाच्या बळावर नावलौकिकास आली आहे. संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांची,पत्रकारांची भेट गाट व्हावी, विचारांची देवाण घ्यावी व त्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी एकविरा देवी मंदिर हिवरा (संगम ) तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकुलवार यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे संजय राठोड, मृदा व जलसंपदा मंत्री हे राहणार आहेत तर उदघाटक म्हणून नांदेड चे पालकमंत्री गिरीश महाजन हे असणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून नागेश पाटील आष्टीकर खासदार हिंगोली, संजय देशमुख खासदार यवतमाळ वाशिम, गणेश कचकुलवार राष्ट्रीय अध्यक्ष युवा ग्रामीण पत्रकार संघ,प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपूर आर्णी,अशोकराव चव्हाण राज्यसभा खासदार, वसंतराव चव्हाण खासदार नांदेड,प्रतापराव पाटील चिखलीकर माजी खासदार नांदेड,हेमंत पाटील माजी खासदार हिंगोली, श्याम भारती महाराज माहूर, राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज माहूर,अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड, पंकज आसिया जिल्हाधिकारी यवतमाळ,श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड,पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ हे उपस्थित राहणार आहेत.
या राज्यस्तरीय आदेशनामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या कार्यासाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय संघांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या राज्यव्यापी अधिवेशनास युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी,पत्रकार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकुलवार यांनी केली आहे.