देश

हिमायतनगर शहरातील शाळा काॅलेज-मधील विद्यार्थिनींसाठी पोलीसांनी बंदोबस्त करण्याची मागणी..

ठाणे जिल्ह्यातील बदलापुर येथील ४ वर्षाच्या चिमुकलीवर लैर्गीक अत्याचार केलेल्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यांत यावी व हिमायतनगर शहरातील नामांकित कॉलेज हुतात्मा जयवंतराव पाटील कॉलेज व शाळा, राजा भगीरथ माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय, व रेल्वे स्टेशन आणि परमेश्वर मंदिर परिसर व गणेश मंदिर या ठिकाणी बंदोबस्त व बस मागे मोटार सायकल घेऊन फिरणाऱ्या रोड रोमीयांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे…                                                        ठाणे जिल्ह्यातील बदलापुर येथील आदर्श विद्या मंदिर मध्ये चार वर्षाच्या चिमुरडीवर तेथील सफाई कर्मचाऱ्याने लैंगीक अत्याचार केलेली घटना समोर आली असुन, महाराष्ट्रामध्ये मुलींच्या सुरक्षेमध्ये आपण कुठ कमी पडतोय हा प्रश्न आता इथल्या प्रत्येक आई वडीलांना पडत आहे. तसेच लातुर जिल्ह्यातील चाकुर येथे साडे चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगीक अत्याचाराची घटना उघडकीस आली व अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मध्ये इ.८ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनींना अश्लिल व्हिडीओ दाखवत लैंगीक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असुन तेथील शिक्षक प्रमोद सरदार यांच्यावर वरील सर्व घटनामधील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून कठोर शिक्षा देण्यांत यावी.पुढे चालुन असले कृत्य करतांना आरोपीच्या मनात मिती निर्माण झाली पाहिजे कठोर पावले उचलावी तसेच हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर परिसर यासाठी महाविद्यालय परिसरात मुलीच्या संरक्षणासाठी पोलीस सुरक्षा देण्यांत यावी. कारण वरील घटनेची पुनरावृत्ती हिमायतनगर शहरात होवु नये याकरीता आपल्या पोलीस प्रशासनाकडून महाविद्यालय / शाळा व मंदिर परिसर व बस स्टॅन्ड परिसरात शाळेच्या वेळेनुसार पोलीस बंदोबस्त ठेवण्यांत यावा.व टवाळखोरी करणाऱ्या टवाळखोरावर योग्य ते शासन करावे असे निवेदनात नमूद करून मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.गृहमंत्री, यांना.तहसीलदार मॅडम, हिमायतनगर द्वारे दिं २२ ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड ,शहर अध्यक्ष संजय माने, ॲड ज्ञानेश्वर पंदलवाड ,विलासराव वानखेडे,महेश पाटील शिरफुले, निलेश चटने, श्रीदत्त पाटील सोनारीकर, कैलास पाटील दुधड कर, पंडित ढोने,धोंडोपंत बनसोडे,अनिल नाईक,सह अनेक पालक उपस्थित होते. निर्भया पथक स्थापन करणार असे तहसीलदार मॅडम यांनी सांगितले.

बदलापुर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी द्या व हिमायतनगर शहरातील रोड रोमिओचां बंदोबस्त करा*
अशी पालकांची मागणी…‌अन्यथा‌ कायदा हतात घेऊन आम्ही संरक्षण करु-श्री दत्त पाटील सोनारीकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}