तामसा नांदेड रोड वरील पिंपराळा पाटीजवळ भीषण अपघात दोन जन जागीच ठार..
हदगाव तालुक्यातील तामसा नांदेड रोडवर वरील पिंपळगाव पाटीजवळ चार चाकी वाहन पानटपरी ला धडकल्यामुळे दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे..
हदगाव तालुक्यातील तामसा जवळील भुरी तांडा येथील गंगाधर कैलास राठोड वय २४ वर्ष, कबीर दिलीप चव्हाण वय २२ वर्ष हे दोन्ही जण भुरी तांडा येथील रहिवासी असून तामसा येथुन चार चाकी क्रं एम एच ४६ डब्ल्यू ०५४७ वाहनाने नांदेड ला जात असताना तामसा नांदेड रोड वरील पिंपळगाव पाटीजवळ अचानक चार चाकी क्रं एम एच ४६ डब्ल्यू ०५४७ वाहनाचे टायर फुटल्याने वाहनावरील वाहन चालकाचे ताबा सुटल्याने तामसा नांदेड रोडवरील पिंपराळा पाटी जवळील वळण रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पानटपरी ला जोरदार धडक बसल्याने कार पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे अपघातात दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मत्यू झाल्याची घटना समजताच तामसा पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला आहे दोन्ही मृतदेह तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.