राजनीति

भोकर विधानसभेत मतदारांच्या मते. इंजी-दामीनी दादाराव ढगे पाटील यांचाच बोलबाला

दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुक जसी जसी जवळ येत आहे.तसी तसी नवखे उमेदवार हवा तापवत अडीअडचणीत असलेल्या वा दु:खात असो की संकटात त्यांना मदत करताना दिसत आहेत.यातील काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागणार्या कु.इंजी- दामीणी दादाराव ढगे ह्या मतदार संघात मतदारांच्या भेटी घेत ज्या ठिकाणी अपघातात मृत्यू पावलेल्या किंवा वीज कोसळुन मयत झालेल्या वा संकट कोसळलेल्या गरजु लोकांना आर्थिक मदत करत असल्याने मतदारांत त्यांच्या बद्दल सहानुभूती मिळताना दिसुन येत आहे.सध्या तरी भोकर विधानसभेत मतदारांमध्ये कु.दामीनी दादाराव ढगे यांचाच

बोलबाला दिसत असल्याचे चित्र आहे.महाविकास आघाडीची जर ढगे यांना उमेदवारी मिळाली तर भाजपच्या उमेदवारास नाकीनऊ आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.काँग्रेस पक्षाकडून भोकर विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा बाळगून असलेले गुतेदार दादाराव ढगे हे सातत्याने कार्यकर्त्यांवर अन्याय करत केवळ घराणे शाही चालवणार्याना साम,दाम , दंड,भेद व निती वापरुन पराभव करण्याचा चंग बांधलेला दिसतो.म्हणुन सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तोडीसतोड म्हणून ते त्यांची उच्चशिक्षित मुलगी कु.इंजी- दामीनी ढगे यांना उतरवत काँग्रेस पक्षाच्या तिकिटांची मागणी करत आहेत. दि. ५ आॅगष्ट रोजी भोकर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित केली.यात त्यांनी चव्हाण कुटुंबांच्या घराणेशाहीवर टिका केली भोकर तालुक्यात अद्याप सिंचनाचे पाणी आणले नाही.केवळ मतदारसंघात जनतेला खोटे आश्वासन द्यायचे अन् निवडणूक आली की,बनवा बनवी करुन निवडुण यायाच आणि विकासाच्या नावावर बोंब.भोसी पासून तेच पाणी लिफ्ट द्वारे आणता आलं असतं पण इच्छा शक्ती पाहिजे.तसे केले नाही. त्यामुळे जरी महाविकास आघाडीचे तिकीट जरी मिळाले नसले तरी मी ज्यांना काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी साम,दाम देऊन भक्कमपणे उभे राहुन घराणेशाहीला या मतदारसंघातातुन पळवु असे त्यांनी सांगितले. तरी सध्या या मतदारसंघात दादाराव ढगे हिरो असुन त्यांचाच बोलबाला दिसुन येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}