करंजी येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.
प्रतिनिधी विकास गाडेकर/हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षीही दिं २० ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची 104 व्या जयंती निमित्त काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष गजाननराव सूर्यवंशी यांच्या हस्ते सकाळी ९:०० वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व लाल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष गजाननराव सूर्यवंशी म्हणाले अण्णाभाऊनी दीड दिवस शाळा शिकून आपल आयुष्य समाजासाठी अर्पित केल गाव कुसा बाहेर च्या समाजाला त्यांच्या साहित्यच्या माध्यमातून समाजाला प्ररावृर्तीत केल. समाजाने अण्णाभाऊ साठे यांना डोक्यावर घेऊन नाचण्या पेक्षा अण्णाभाऊ साठे यांना डोक्यात घेतलं पाहिजे,तसेच आपल्या लेकराबाळांना शिक्षणाचा प्रवाहात आणलं पाहिजे,असे जयंती निमित्त बोलताना म्हणाले.यावेळी बालाजी पुट्ठेवाड(सरपंच ), नासर पठाण माजी संचालक, शबीर पठाण उपसरपंच,अरविंद सावते लाईमेन, संजय चाभरेकर, गोविंद पाटील करंजीकर, माधव धोंडगे, सज्जन कदम, रमेश सुकळीकर,गजानन गाडेकर, माधव गाडेकर, जळबा गाडेकर, रवी गाडेकर, वसंता गाडेकर,चांदराव गाडेकर, मोहन गाडेकर,महादू गाडेकर, रामा गाडेकर, परमेश्वर गाडेकर,दिलीप गाडेकर, प्रसाद गाडेकर, मधुकर गाडेकर, तानाजी गाडेकर, विकास गाडेकर, ज्ञानेश्वर मुळेकर, कार्यकर्माचे सूत्रसंचालन व आभार शिवाजी गाडेकर सर केले. यावेळी महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.