खेल

बँक ऑफ महाराष्ट्र ने शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट ला लावलेला होल्ड त्वरित काढा..

पुसद तालुका काँग्रेस कमिटीची मागणी.

ता: पुसद यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे त्यामध्ये पुसद तालुका हे अतिदुर्गम भाग म्हणून ओळख आहे या जिल्ह्यात तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या झाल्या व होत आहेत अशातच कधी ओला दुष्काळ तर कधी वाळा दुष्काळ असा अनेक समस्या शेतकऱ्यांपुढे असल्यामुळे उदरनिर्वाह करण देखील शेतकऱ्यांना कठीण होत चालला आहे.

अशातच पुसद येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते गेल्या काही दिवसापासून अनेक ग्राहकांची खाती होल्ड करण्यात आल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणी येत असुन शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टाकता येते मात्र खात्यामधून रक्कम काढता येत नाही या कारणामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. काही शेतकऱ्यांनी या संदर्भात संबंधित बँकेची संपर्क साधला असता आधी पीक कर्जाची थकित रक्कम भरा त्यानंतरच व्यवहार सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पी,एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये जमा झाले तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विहिरीचे अनुदान जमा झाली आहे ही रक्कम निघत नसल्याने शेतकऱ्याची अडचणी वाढल्या असून बँक व्यवस्थापकांनी बँक खात्याला लावलेला होल्ड सात दिवसात हटवण्यात यावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा त्या मनमानी करणाऱ्या बँकेला समज द्यावी नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मा पुसद तहसीलदार साहेब यांना निवेदन  देण्यात आला. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक महा सचिव सय्यद इसतीया्क, काँग्रेस शहराध्यक्ष जिया शेख तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ज्ञानदीप कांबळे, अल्प जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल वाहब, अल्प. शहराध्यक्ष जब्बार लाखे,युवक काँग्रेसचे अभिलाष खैरमोडे ,युवा काँग्रेसचे अध्यक्ष शाहिद मिर्झा,नागेश राऊत, अमजद खान,अभी कांबळे आकी पाईकराव तथा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}