मा.सतीशजी कावडे तुफानातील दिवे’ या सामाजिकता पुरस्काराने आज सन्मानित होणार..
अनुसूचित जाती, दलित, बहुजन समाजावर झालेल्या अन्याय अत्याचारा विरुद्ध लढून त्या घटनांचा शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी सदैव तत्पर असणारं निर्भीडपने रोखठोक व प्रभाविपने बोलणारं, घटना व परिणाम यांचे गांभीर्य ओळखून त्याचे समाजावर व शासन प्रश्नावर भविष्यात होणारे बरे वाईट परिणाम पटवून देणारं खंबीर नेतृत्व म्हणजे मा. सतीशजी कावडे साहेब.त्यांच्या या जागरूक समाजकार्याची दख्खल घेऊन दि. २४-०८-२०२४ रोजी नांदेड येथे आयोजित ‘युगकवी वामन दादा कर्डक व प्रतापसिंह बोडदे’ संस्कृत जयंती सोहळा २०२४ या अशा भव्यदिव्य कार्यक्रमात मा. सतीशजी कावडे यांना ‘तुफानातील दिवे सामाजिकता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सदरील कार्यक्रमाचे उदघाटक मा. सायलू आण्णा म्हैसेकर, अध्यक्ष फारूक अहेमद तर स्वागतध्यक्ष इंजिनियर मा. प्रशांत इंगोले आहेत.
मा.सतीश कावडे यांना यापूर्वीही नांदेड जिल्हा सर्वजनिक जयंती मंडळ, नांदेड. २०२३ च्या वतीने ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित तर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून ‘लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सामाजिक पुरस्कार २०२२ हा बहुमान देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अशा या बहुआयामी अष्टपैलू व्यक्तीमत्वाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जात आहे.