देश
अल्पसंख्याक विद्यार्थ्याना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती..
नांदेड, दिं.४ सप्टेंबर सन २०२४-२५ मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यासाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेतर्गंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिलेली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेतर्गत लवकरात लवकर आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय म.रा. पुणे यांचे स्तरावर ६ सप्टेंबर २०२४ पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.