देश

नदी नाल्यालगदच्या शेतकऱ्यांना वेगळा वाढीव निधी मंजूर करुन मदत द्या -भाजपा कार्यकर्त्यांची मागणी..

प्रतिनिधी नितीन राठोड/हदगाव हिमायतनगर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असून ह्या पावसाच्या पुराने नदी नाल्यालगद असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून ह्या शेतकरी बांधवांच्या शेतीचे व पिकांचे पूर्ण नुकसान तर होतच आहे सोबत त्यांच्या जमिनी पूर्णत: खरडून जात आहेत त्यामुळे हे शेतकरी बांधव मोठ्या आडचणीत सापडत आहेत. आणि सरकार कडून जे सरगट अनुदान दिल्या जाते त्या मदतीने नदी नाल्यालगदच्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत होत नसून उलट त्यांची थट्टा करण्याचा प्रकार सतत होत असल्याची खंत त्या शेतकरी बांधवा तर्फे व्यक्त होत आहे. कारण दरवर्षी नदी नाल्यालगदच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नदी न/ नाल्यांचे सरळीकरण व खोलीकरण न केल्यामुळे पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये उलटून त्या पाण्याच्या प्रवाहामुळे शेतकऱ्यांची शेती व पिके पूर्ण वाहून जात आहेत/ गेले आहेत. म्हणून तहसीलदार साहेब तहसील कार्यालय हिमायतनगर यांना भाजपा किसान मोर्चाच्या नेतृत्ववाखाली भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल, भाजपा किसान मोर्चा नांदेड उत्तर जिल्हा चिटणीस विजय पांडुरंग सुरोशे, भाजपा किसान मोर्चा तालुका अध्यक्ष विकास विक्रम कळकेकर यांचे वतीने तहसील कार्यालय हिमायतनगर येथे निवेदन देण्यात आले आहे. सोबत विपुल दंडेवाड, शिणू सेवनकर,दुर्गेश मंडोजवार, परमेश्वर नागेवाड, नीलकंठ पाटील बोरकर, बालाजीराव पाटील कारले, व अविनाश भोंगाळे, माधवराव गायकवाड, व पिडीत शेतकरी बांधव उपस्थित होते नदी नाल्यांच्या बाजूच्या बाधित क्षेत्राचे सर्वे करून जे नदी नाल्यालगदचे शेतकरी आहेत आणि ज्यांचे पूर्ण नुकसान झाले आहे आशा शेतकऱ्यांना वेगळा वाढीव/भरीव निधी मंजूर करून ह्या शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करून सन्माननीय मुख्यमंत्री साहेब व सन्माननीय उप मुख्यमंत्री साहेब तसेच सन्माननीय कृषिमंत्री साहेब यांनी त्वरित पिडीत शेतकरी बांधवांना वाढीव निधी मंजूर करून मदत द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}