शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कैलास वाळके तर उपाध्यक्ष राघोजी डवरे यांनी निवड.
हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळकेवाडी येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी कैलास विठ्ठल वाळके तर उपाध्यक्षपदी राघोजी धारबा डवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जि.प.प्राथमिक शाळा वाळकेवाडी येथे दि – ६ सप्टेंबर रोजी, तात्कालीन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी खिरोजी वाळके यांच्या अध्यक्षतेखाली पालकसभा आयोजित करून शालेय व्यवस्थापन समिती २०२४-२५ ते २०२५-२६ पुनर्गठीत करण्यात आली.
या दोन वर्षाच्या कार्यकाळासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास वाळके, उपाध्यक्ष राघोजी डवरे, स्थानिक प्राधिकरण सदस्य संजय माझळकर, शिक्षण प्रेमी सदस्य शामसुंदर वानोळे, गजानन मेटकर, खिरोजी डवरे, संदीप वाळके, बबन सरकुंडे, रामदास गोरे, दत्तात्रेय पिंपरवार, किशन डवरे, ग्यानबा रोकडे व शिक्षक प्रतिनिधी म्हणून सारिका सिलगमवार या सर्व सदस्यांची निवड करण्यात आली.