लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे अध्यक्षपदी सुदर्शन बरकमकर तर उपाध्यक्षपदी विशाल रामराव गुंडेकर यांची निवड..
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सोहळा मोठा उत्साहात साजरा होणार असल्याने कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी सुदर्शन बरकमकर तर उपाध्यक्षपदी विशाल रामराव गुंडेकर यांची निवड समाज बांधवांच्या कॉम्रेड श्याम गुंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये एकमताने निवड करण्यात आली. यावेळी समाजातील जेष्ठ नेते गोविंदराव जळबाजी गुंडेकर, माजी उपसरपंच राम गुंडेकर, पत्रकार संघटनेचे तालुकाप्रमुख दत्ताभाऊ शिराणे, सेवानिवृत्त संभाजी बनसोडे कॉम्रेड श्याम गुंडेकर, गणपत संभाजी बनसोडे, शाहीर सुभाष गुंडेकर, रमेश गुंडेकर, टेलर मारुती गुंडेकर, संजय गुंडेकर, सेतु संचालक पवन बनसोडे, परमेश्वर बनसोडे, मारोतराव गुंडेकर, सुदाम गाडेकर, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती सोहळा 31ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला असून सकाळी ९:०० वाजता सन्माननीय ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता रामराव गुंडेकर यांच्या हस्ते सकाळी ९:०० वाजता होणार असून गावामधून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. अशी माहिती जयंती मंडळाचे संयोजक गोविंदराव जळबाजी गुंडेकर यांनी सांगितले.