करंजी येथे श्रीमद भागवत सप्ताह तथा शिवपुराण कथेचे आयोजन..
हिमायतनगर विशेष प्रतिनिधी/विकास गाडेकर हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गावाकऱ्यांच्या वतीने महादेव मंदिर येथे श्रीमद भागवत सप्ताह शिवपुराण कथेचे आयोजन दिनाक 12 सप्टेंबर 2024 पासून भागवताचार्य हं.भ.प विदर्भ रत्न अजय म.महाजन (दादा)महाराज यांच्या मधुर वाणीतून संपन्न होणार आहे.
त्यामध्ये दर दिवशी सकाळी चार ते सहा काकडा भजन, सकाळी सहा ते नऊ ज्ञानेश्वरी पारायण दुपारी एक ते पाच सांगितलंय शिवपुराण कथा, सायंकाळी पाच ते सात हरी पाठ व रात्री नऊ ते बारा वाजता हरिकीर्तना कार्यक्रम संपन्न होणार आहे.यामध्ये सात दिवस विविध कीर्तनकार यांच्या अमृतवाणीतून कीर्तनचा कार्यक्रम होणार आहे.तसेच दिनांक 19 सप्टेंबर रोजी गुरुवारी सकाळी आठ ते अकरा वाजे दरम्यान गावातून मुख्य मार्गाने मिरवणूक व शोभायात्रा निघेल तसेच हं.भ.प आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज मधापुरीकर यांचे सकाळी अकरा ते एक काल्याचे कीर्तन होऊन समारोप होईल या श्रीमद भागवत सप्ताह शिवपुराण कथेचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन गावाकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.