नांदेड येथील संविधान सन्मान सामाजिक न्याय रॅलीत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे..
सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण व्हावेत भारतात बंधुभाव,सामाजिक न्याय प्रस्थापित रहावे. भारत देश मजबूत राहिला पाहिजे हे संविधानामध्ये विविध कलमे टाकलेले आहेत.संविधान हा भारतीयांचा कणा आहे. भारतीय संविधान हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने लिहून जगामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे.या संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला स्वाभिमानी जगण्याचे बळ प्राप्त होत असते.यासाठी लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित येत्या दिं.२० सप्टेंबर २०२४ रोज शुक्रवारी दुपारी ठिक ०१:०० वाजता सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या शेजारी पासुन ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत संविधान सन्मान सामाजिक न्याय रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही रॅली अतिशय मोठ्या ताकदीने पूर्ण करण्यात येणार आहे.या संविधान सन्मान सामाजिक न्याय रॅलीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती उपवर्गीकरण आरक्षणा विषयी दिलेल्या निर्णयाचे न्यायालयाविषयी आभार व महाराष्ट्र सरकार कधी उपवर्गीकरणाचा विषय मार्गी लावणार? याविषयीचे सखोल असे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या सामाजिक न्याय रॅली मध्ये लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे प्रमुख प्रा.रामचंद्रजी भरांडे सर, मा.व्ही.जी.डोईवाड मा. रावसाहेबदादा पवार,नागोराव नामेवार सर,पंडित अंबुलगेकर, आदी मान्यवर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.सर्व संविधान प्रेमींनी या संविधान सन्मान सामाजिक न्याय रॅलीस उपस्थित राहुन सहकार्य करण्यात यावे,असे आवाहन लोकस्वराज्य आंदोलनाचे नांदेड जिल्हाध्यक्ष धोंडोपंत बनसोडे, सदानंद ऐरणकर पार्डीकर तालुकाध्यक्ष हिमायतनगर,रामदास जळपते तालुका सचिव,गोविंदमामा जळपते पोटेकर तालुकाध्यक्ष अँटो युनियन प्रणीत हिमायतनगर आदी कडुन करण्यात येत आहे.